कॅशलेस व्यवहारामुळे चिनी कंपन्यांचाच फायदा -पृथ्वीराज चव्हाण

कॅशलेस व्यवहाराचं आवाहन करुन सरकार चिनी कंपनीचा फायदा करुन देत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. कॅशलेस व्यवहाराच्या नादात अनेक चिनी कंपन्या भारतात आणल्या जात आहेत. त्यामुळे या अॅप्लिकेशन्सचा वापर करून चिनी कंपन्यांचा फायदा होत असून देशाचं नुकसान होत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.

भाजपने लोकसभा व विविध राज्यांच्या निवडणुका क्रेडिट, डेबिट कार्डातून पैसे काढून लढवल्या? असा प्रश्नही विधानभवन परिसरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.

विकसित देशांत मोठ्या प्रमाणावर रोखीने व्यवहार चालतो. भारतात कोणतेही नियोजन न करता सर्व व्यवहार रोकडरहित कसे करणार, या प्रश्नाचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही नाही, अशी टीका चव्हाणांनी केली.