हा फसवेगिरी विरोधात लोकांनी दिलेला निकाल – पृथ्वीराज चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेसला मिळालेलं यश हा भाजपची धोरणं, फसवेगिरी याविरोधात लोकांनी दिलेला निकाल आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आहे. तीन महत्त्वाची राज्ये भाजप गमावण्याची शक्यता आहे.

Loading...

याबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हाणाले, “राहुल गांधी अध्यक्ष झाल्यावर त्यांनी सर्व ट्रेंड बदलला होता. त्यांनी अनेक मुद्दे लावून धरले. सर्व काँग्रेस नेते एकत्र येऊन हे यश मिळवलं आहे. देशात कोणी कोणत्या पक्षाला संपवू शकत नाही”.

याशिवाय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही आम्ही सर्व काँग्रेस नेते जोमाने काम करु. राज्यात आता राष्ट्रवादी आणि इतर छोटे पक्ष आमच्यासोबत येतील हे नक्की आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केलं.Loading…


Loading…

Loading...