भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ती देशातील शेवटची निवडणूक ठरेल: पृथ्वीराज चव्हाण

Former Maharashtra Chief Minister Prithviraj Chavan

मुंबई: २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी झाल्यास ती शेवटची निवडणूक ठरेल तसेच देश हुकूमशाहीत लोटला जाईल असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे. राज्यातील भाजप शिवसेनेकडून सत्तेच्या जोरावर कोणतेही निर्णय घेतले जात असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्ष उरले असतानाच सर्वच पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य हे याचाच भाग असल्याच दिसत आहे.

विधानसभा सभापतीं विरोधात आम्ही अविश्‍वास प्रस्ताव मांडल्यानंतर 14 दिवसांत निर्णय घेवून त्यावर सभागृहात चर्चा घेवून मतदान घेणे बंधनकारक आहे. मात्र, बहुमत असलेल्या भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारने चर्चाच नाकारल्याच पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. बँकामध्ये कोट्यावधीचे घोटाळे करणारे लोक देश सोडून पळून जातात, त्यामुळे सरकार बँकांना वाचवण्यासाठी कोणत्याही परवानगीशिवाय सामान्यांच्या खात्यातील पैसे बँकेच्या भागभांडवलात वळती करण्याचा कायदा करण्याचा घात घालत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला आहे.