राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला; पृथ्वीराज चव्हाणांकडून स्पष्टीकरण

chavan

मुंबई : ‘एखादे सरकार चालवणे आणि सरकारला पाठिंबा देणे या दोन्हीमध्ये फरक असल्याचे वक्तव्य कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात होते.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले आहे. ‘राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. ही चर्चा भाजपाकडून मुद्दामहून घडत असल्याचा गंभीर आरोप चव्हाण यांनी केला.

राहुल गांधी यांनी केलेल्या त्या विधानाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी फोनवरून राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी सांगितले की, ‘आपण केलेल्या विधानाचा कोणताही गैरअर्थ नसून राज्य सरकार करोनाविरोधातील लढ्यात योग्य काम करत असल्याचे सांगितले’.

दरम्यान, ‘काँग्रेस पूर्णत: महाविकास आघाडीच्या पाठीशी असून करोनाविरोधातील लढय़ात सरकारला सर्वप्रकारे सहाय्य केले जाईल,’ असे आश्वासनही राहुल गांधी यांनी दिले.

महत्त्वाच्या बातम्या

महाविकास आघाडीकडे केवळ दोनच पर्याय, भातखळकरांचा हल्लाबोल

लॉकडाऊन शिथिल करताना विषाणूचा पाठलाग अधिक गांभीर्याने करा – उद्धव ठाकरे

तुमच्यात हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवाच, सेनेच्या वाघाने फोडली डरकाळी