सांगली लोकसभेला कॉंग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण?

टीम महाराष्ट्र देशा – सांगली लोकसभेसाठी वसंतदादा घराणे, पतंगराव कदम घराण्यातील नावांमध्ये उमेदवारीसाठी चुरस आहे. आता यांच्यासोबत कॉंग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव पुढे केले असल्याची माहिती मिळत आहे.

Loading...

काही दिवसांपूर्वी प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील तीन उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. महाष्ट्रातील 48 जागांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस समवेत आघाडीवर शिक्कामोर्तब झाले असले तरी जागा वाटप प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. मात्र प्रदेश कॉंग्रेसने नुकतीच मुंबईत बैठक घेऊन 26 जागांवरील उमेदवारांची नावे निश्चित केल्याचे कळते. अंतिम निर्णयासाठी ही यादी दिल्लीला पक्षनेतृत्वाकडे पाठवण्यात येणार आहे.

संभाव्य उमेदवार
सोलापूर – सुशीलकुमार शिंदे
नागपूर – विलास मुत्तेमवार किंवा नाना पटोले
चंद्रपूर – देवतळे किंवा आशिष देशमुख
शिर्डी – भाऊसाहेब कांबळे
नंदुरबार – के सी पाटील
वर्धा – चारुलता टोकस
दक्षिण मुंबई – मिलिंद देवरा
यवतमाळ – माणिकराव ठाकरे
नांदेड – अमिता चव्हाण

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...