सरकारने लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न बाजूला ठेवून 370 कलम प्रचाराचा मुद्दा केला : चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा : कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप सरकारला लक्ष केले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

चव्हाण यांनी पालिका शाळा क्रमांक तीनमधील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सौ. सत्त्वशीला चव्हाण व सौ. रजनीताई पाटील याही उपस्थित होत्या.

यावेळी चव्हाण माध्यमांशी बोलताना म्हणाले,’ राज्यात परिवर्तन होणार हे निश्चित आहे. सरकारचे अपयशच त्यासाठी कारणीभूत ठरेल. लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न बाजूला ठेवून 370 कलम हा प्रचाराचा मुद्दा विरोधकांनी केला आहे. पायाभूत सुविधा, आर्थिक मंदी आधी प्रश्न आ वासून उभी असताना त्याकडे सरकारने केलेले दुर्लक्ष केले, असे चव्हाण म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या व बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील कुटुंबासह बारामती येथे मतदानाचा बजावला आहे. यावेळी सुळे यांनी माध्यमांशी बोलताना मतदानानंतरची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्या बोलताना सुळे यांनी आघाडीचेच सरकार येणार असा विश्वास व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या