‘पटोलेंच्या बोलण्याने महाविकास आघाडीवर काहीही परिणाम होणार नाही’, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

prithwiraj chavhan

मुंबई : काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. इतकेच नाही तर नाना पटोले हे वारंवार स्वबळावर निवडणूक लढण्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही आपल्या खास शैलीत नाना पटोलेंवर भाष्य केलं. त्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही पटोलेंचे कान टोचले होते. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

परंतू काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पटोलेंची बाजू घेतल्याचे दिसून येत आहे. नाना पटोलेंच्या स्वबळाच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकारवर काही परिणाम होणार नाही असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

ते म्हणाले, काँग्रेसची १९९९ पासूनची निवडणुकांची परंपरा सुरू आहे. त्यामध्ये काहीही फरक नाही. विधानसभा, लोकसभांची रणनीती ही केंद्रातून ठरते. अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात. प्रदेशाध्यक्ष पटोले कार्यकर्त्यांना बळकटी देण्यासाठी ताकद वाढवा, आपण मुख्यमंत्री पदापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू, असे सांगत आहेत. मात्र, त्याचा महाआघाडी सरकारवर काही परिणाम होईल, असा तर्क काढणे योग्य नाही. सध्याचे महाविकास आघाडी सरकार हे पाच वर्षे चालेल असा दावाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या