पदार्पणातच पृथ्वी शॉने केला अत्यंत लाजिरवाणा विक्रम

pruthvi

श्रीलंका : भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या पदार्पणातच त्याने नकोस विक्रम त्याने आपल्या नावे केला आहे. पृथ्वी शॉ सर्वात कमी धावा करणारा भारतासाठी सलामी देणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. पृथ्वी शॉसाठी हा पहिला सामना अजिबात चांगला गेला नाही. टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर बाद होणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला.

पृथ्वी शॉचे सर्वात कमी वयात टी -२० मध्ये पदार्पण 

पृथ्वी शॉ टी -२० मध्ये भारतासाठी सर्वात कमी वयात सलामी देणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. वयाच्या 21 वर्षांत त्याने एक नवीन विक्रम नोंदविला. भारतासाठी कसोटींमध्ये विजय मेहरा सर्वात तरुण होता, तर पार्थिव पटेलने वनडेमध्ये ही कामगिरी केली होती.

कसोटी, एकदिवसीय आणि टी -२० सामन्यात भारताचा सर्वात युवा सलामीवीर

कसोटी – विजय मेहरा (17 वर्षे 265 दिवस)

वनडे – पार्थिव पटेल (18 वर्षे 317 दिवस)

टी 20 आय – पृथ्वी शॉ (21 वर्षे 258 दिवस)

पदर्पणातच पृथ्वी शॉच्या नावावर अत्यंत लज्जास्पद रेकॉर्ड 

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो डावाच्या पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. पहिल्याच चेंडूवर बळी ठरला, तसेच टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताने पहिल्याच चेंडूवर बाद केलेला पहिला भारतीय फलंदाजही ठरला.

महत्त्वाच्या बातम्या