पृथ्वी शॉची तुलना कोणाशी होऊ शकत नाही : आकाश चोप्रा

pruthvi show

श्रीलंका : भारताची ‘युवा’ टीम सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तीन विकेटने विजय मिळवला आहे. दुसरा सामना जिंकत टीम इंडियाने मालिकाही खिशात घातली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पृथ्वी शॉ याने आक्रमक खेळी केली त्यामुळे त्याचे बऱ्याच मान्यवरांनी कौतुक केले तर काहींनी सेहवागची उपमा देखील दिली यावेळी माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व समालोचक आकाश चोप्रा यांनी देखील त्याचे कौतुक केले आहे.

पृथ्वी शॉ सारखा नवोदित क्रिकेटपटू सध्याच्या काळात कोणत्याही संघात नाही, इतकेच काय सध्याच्या भारतीय संघातही त्याची तुलना कोणाशी होऊ शकत नाही, असेही आकाश चोप्रा म्हणाले आहे.

पुढे ते म्हणाले, मी पृथ्वी शॉ सारखा फलंदाज सध्याच्या काळात शोधून सापडणार नाही. पृथ्वीने जशी विजय हजारे करंडक आणि आयपीएलच्या फलंदाजी केली तशीच त्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही कायम ठेवली. वीरेंद्र सेहवाग अशी फलंदाजी करायचा. आज पृथ्वीची फलंदाजी पाहिली की सेहवागचीच आठवण येते. सध्या पृथ्वी फॉर्मात आहे. तसेच श्रीलंका दौऱ्यातील कामगिरीच त्याला प्रमुख संघात स्थान मिळवून देण्यासाठी उपयोगी ठरणार असल्याचं देखील चोप्रा म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP