खा.मुंडे यांच्या प्रयत्नातून अंबाजोगाई रुग्णालयासाठी मिळाले अजून 40 व्हेंन्टीलेटर 

pritam munde

बीड  ( प्रतिनिधी ) – करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात, वेंटिलेटर उपलब्ध करून घेण्यासाठी जिल्ह्याच्या खा डॉ .सौ प्रीतम गोपीनाथ मुंडे यांना यश आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहाय्यता निधी मधून आणखीन चाळीस व्हेंटिलेटर मिळाल्याची माहिती केज विधानसभा मतदार संघाचे आमदार सौ. नमिता अक्षय मुंदडा यांनी दिली आहे .त्यांनी पंतप्रधान आणि खासदारांचे आभार मानले आहेत आता जिल्ह्यासाठी एकूण 78 व्हेंटिलेटर चार दिवसात आल्याचेही त्यांनी सांगितले.

कोरोना संकट सुरू झाल्यानंतर बीड जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेत व्हेंटिलेटर ची फार मोठी कमतरता होती. जिल्ह्यात स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय हे गरिबासाठी वरदान असून .आशिया खंडातील एकमेव आहे .वर्तमान आरोग्याच्या संकटात वेंटिलेटर असणे महत्त्वाचे होते. आपल्या जिल्ह्यासाठी व्हेंटिलेटर मिळावे म्हणून  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मुंडे यांनी सतत पाठपुरावा केला होता .

त्याचाच एक भाग म्हणून चार दिवसापूर्वी बीड जिल्ह्याला सतरा व्हेंटिलेटर मिळाले .त्यानंतर पुन्हा अंबाजोगाई साठी दहा आले असून, लोखंडी सावरगाव येथे उभा करण्यात आलेल्या रुग्णालयासाठी 30 व्हेंटिलेटर आल्याची माहिती विभागाच्या आमदार सौ .नमिता ताई मुंदडा यांनी दिली आहे . वर्तमान संकटात वेंटिलेटर मुळे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच फार मोठ रक्षण होईल असेही आमदार यांनी सांगितलं. एवढेच नाही तर त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर मिळून दिल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार प्रीतम मुंडे यांचे आभार मानले आहेत.

आंबाजोगाई मेडिकल कॉलेज ला आणखी पंतप्रधान सहायता निधी पी एम केअर मधून आणखी 10 व्हेंटिलेरर मिळाले आणि लोखंडीसावरगाव येथे 30 व्हेंटिलेरर मिळाले म्हणजेच बीड जिल्ह्याला 78 व्हेंटिलेटर खासदार डॉ प्रीतम मुंडे याच्या पाठपुराव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आ नमिता अक्षय मुंदडा यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व खासदार डॉ प्रितम मुंडे याचे आभार मानले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘फडणवीस फिल्डवर काम करत असल्याने जनता कौतुक करित आहे त्यामुळे आदित्य ठाकरेंना पोटशूळ उठले’

अपयशाबद्दल राजीनामा देण्याची पद्धत व नीतिमत्ता आपल्या देशात नाही, राऊतांचा भाजपला टोला