प्रीतम मुंडे दिल्ली गाठणार तर सुशीलकुमारांना वंचितचा फटका बसणार

टीम महाराष्ट्र देशा : १७ व्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्यातील मतदान आज पार पडले. त्यामुळे आता साऱ्या देशाचे लक्ष २३ मे च्या निकालाकडे आणि देशात कोणाचे सरकार येणार याकडे लागले आहे. तसेच आता एक्झीट पोलनुसार लोकसभा निवडणुकीच्या स्पर्धेत असणाऱ्या पक्षांच्या संभाव्य विजयी उमेदवारांची आकडेवारी बाहेर येऊ लागली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी एक्झिट पोलचे कल येण्यास सुरुवात झाले आहे. ‘न्यूज18’च्या एक्झिट पोलनुसार, दुसऱ्या टप्प्यात १० जागांसाठी मतदान झाले होते. बुलडाणा, अमरावती, अकोला, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूरात मतदान झाले होते. सोलापुरातून सुशीलकुमार शिंदे आणि बीडमध्ये प्रीतम मुंडे यांची प्रतिष्ठापणाला लागली होती.

यामध्ये प्रीतम मुंडे या आपली जागा आबाधित राखणार असून नांदेड आणि हिंगोलीत कॉंग्रेस आपल्या जागा गमवणार असा ‘न्यूज18’च्या एक्झिट पोल मध्ये दावा करण्यात आला आहे.म्हणजे अशोक चव्हाण हे पराभवाच्या छायेत दिसत असून. सोपलुरात वंचित बहुजन आघादुकडून उभे असलेले प्रकाश आंबेडकर यांचा फटका सुशीलकुमार शिंदे यांना बसून त्यांचा पराभव होण्याची शक्यता आहे.