…कारण मुंडे साहेबांचे रक्त,संस्कार आमच्याकडे आहेत

परळी वैजनाथ : मोठ्यांचा पाया पडणे, त्यांचे आशीर्वाद घेणे हे रक्तात,संस्कारात असले पाहिजे ते माझ्यात आहेत कारण मुंडे साहेबांचे रक्त,संस्कार आमच्याकडे आहेत म्हणूनच प्रेम करणाऱ्या माणसां समोर नतमस्तक होतांना क्षणभर देखील विचार आम्ही करत नाही असे भावउदगार खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी नाथ्र येथे काढले.

परळी तालुक्यातील नाथरा येथे आज 38 व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ह.भ.प जयवंत महाराज बोधले यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. यावेळी खा.डॉ.प्रितम मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, या जिल्हायची खासदार म्हणून नाही तर या गावाची लेक म्हणून आले आहे. या गावाची माती अदभूत आहे. याच मातीने मुंडे साहेबांसारखे नेतृत्व जन्माला घातले. आज गावातून ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या दिंडीत या लेकीला आत्या-काकू ओवाळत होत्या,आशीर्वाद देत होत्या तेंव्हा त्यांच्या पाया पडताना मला वाकू नको म्हणून त्या म्हणत होत्या परंतु कोणा समोर वाकायचे, कोना समोर ताठ मानेने उभे राहयाचे याचे संस्कार मुंडे साहेबांनी आमच्यावर केले आहेत. साहेबांच्या रक्तातच चांगले संस्कार, विचार असल्याने त्यांचेच रक्त आमच्यात आहे.त्यामुळे प्रेम करणाऱ्या माणसां समोर नतमस्तक होतांना एक क्षणभरही विचार आम्हाला करावा लागत नाही आणि तो आम्ही कधी करत नाही असे त्या म्हणाल्या.

विठ्ठल नामाचा पाऊल

गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. यात खा.डॉ.प्रितम मुंडे सहभागी झाल्या. ठीक ठिकाणी त्यांना गावाची लेक असल्यामुळे ओवाळत होते.गळ्यात टाळ, कपाळ सौभ्याग्यच लेन कुंकवाने भरलेले अशा भक्तिमय वाटवरणात त्यांनी टाळ, मृदुगाच्या ठेक्यात ठेका धरत माता भगिनींन सोबत विठ्ठल नामाचा पाऊल खेळत आनंद घेतला. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी झाली होती.