मुंडे साहेबांचं दर्शन घेऊन प्रितम मुंडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना

बीड : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. पक्ष प्रचारालाही सुरुवात झाली आहे. दरम्यान आज पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. 11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा-शिवसेना-रिपाइं-रासप महायुतीच्या उमेदवार डॉ.प्रीतम मुंडे या आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल करत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी प्रीतम मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडें सोबतच संपुर्ण कुटुंबीयांसोबत वैद्यनाथाचे तसेच गोपीनाथ गडाचे दर्शन घेतले. यावेळी आई प्रज्ञा मुंडे यांनी प्रीतम मुंडेंचे औक्षण करत आशीर्वाद दिले.

विद्यामान खासदार डाॅ.प्रीतम मुंडे आज दुपारी 2 नंतर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी यशःश्री निवासस्थानी त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे यांनी त्यांचे औक्षण केले. पंकजा मुंडे यांच्यासह त्यांनी प्रभू वैद्यनाथाचे व लोकनेते मुंडे साहेबांच्या समाधीचे गोपीनाथ गडावर जाऊन दर्शन घेतले. यावेळी आई प्रज्ञाताई मुंडे, अमित पालवे, बहीण यशश्री मुंडे सह आमदार.आर.टी देशमुख व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.