तर ठरल मग बीडमधून प्रितम मुंडे पुन्हा एकदा लोकसभेच्या मैदानात !

बीड : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यामध्ये आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटला असून अनेक उमेदवार निश्चित करण्यासाठी दोन्ही कॉंग्रेस कामाला लागले आहे. मात्र भाजप – शिवसेना युतीवर अद्याप कोणतीच हालचाल होताना दिसत नाही. दरम्यान, केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भाजपने राज्यातील पहिला उमेदवार जाहीर केला असून बीडच्या विद्यमान खा. प्रीतम मुंडे यांना पुन्हा एकदा लोकसभेच्या उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं आहे. लोकसभा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर असणारे भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी ही घोषणा केली.

bagdure

बीड लोकसभेसाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र बीड लोकसभेचा आढावा बैठकीसाठी आलेले रावसाहेब दानवे यांनी आगामी निवडणुकीमध्ये बीड लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार प्रीतम मुंडेच असतील असं वक्तव्य केल आहे. त्यामुळे प्रतीम यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याच बोलल जात आहे.

मध्यंतरी भाजपकडून करण्यात आलेल्या अंतर्गत सर्वेमध्ये प्रीतम मुंडें यांना रेड झोनमध्ये दाखवण्यात आलं होत. त्यामुळे प्रीतम यांची उमेदवारी धोक्यात आल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र दसरा मेळाव्यावेळी सावरगावमध्ये घेण्यात आलेल्या सभेत पंकजा मुंडे यांनी निवडणूक सर्वेवर नाही तर या सर्वाना ( जनतेला ) पाहून जिंकली जाते असं वक्तव्य केलं होत. दरम्यान, आता खुद्द प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीच प्रीतम मुंडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आता नेमका कोणता उमेदवार देणार याकडे लक्ष लागले आहे.

You might also like
Comments
Loading...