प्रीतम मुंडेंची रक्षाबंधनाची ओवाळणीही पुरग्रस्तांसाठी, भाजपच्या फेरीत जमली सव्वा अकरा लाखांची मदत

परळी : सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी शहरात भाजपतर्फे गुरुवारी (ता. 15) खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या पुढाकाराने काढलेल्या फेरीत 11 लाख 25हजार रुपयांची मदत जमा झाली. रक्षाबंधनाच्या ओवाळणीची रक्कमही त्यांनी पुरग्रस्तांना दिली.
शहरातील हमाल, मापाडी, रिक्षा चालक, व्यापारी, विक्रेते व वृद्धांनी पुरग्रस्तांप्रती संवेदनशीलतेचे दर्शन घडवत सढळ हाताने मदत दिली.

फेरी दरम्यान वैद्यनाथ बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्तांसाठी एका दिवसाचे वेतन मदत म्हणून तर भेल सेकंडरी इंग्लिश स्कुल, शहीद अब्दुल हमीद सेवाभावी संस्था या संस्थांनी ही मदतीचे धनादेश खासदार डॉ. मुंडे यांच्याकडे जमा केले. निसर्गाच्या अवकृपेने बीड जिल्हा सतत दुष्काळाशी सामना करत आहे. जिल्ह्याला दुष्काळी परिस्थितीने जरी ग्रासले असले तरी जनतेच्या मनात मायेचा ओलावा कायम असल्याचे यातून दिसते अशी भवान डॉ. प्रितम मुंडे यांनी व्यक्त केली.

Loading...

दरम्यान अतिवृष्टीमुळे कोल्हापूर सांगलीला आलेला महापूर हा भयंकर होता. या महापुरात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागरिक अन्न, वस्त्र , निवारा या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. नागरिकांना आर्थिक फटका बसलाचं आहे. त्यात आता महापुरामुळे रोगराई पसरू लागली आहे. या हलाखीच्या परिस्थितीत पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
'हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत'
'एमआयएम'ने आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलयं, मनसेला घाबरत नाही
मनसेच्या संघटना बांधणीची जबाबदारी बारामतीकराच्या खांद्यावर
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
पुन्हा मोदी सरकार येणार व मी पुन्हा मंत्री होणार : रामदास आठवले
सावधान : मुंबई आणि पुण्यातही आढळले‘कोरोना'चे संशयित रुग्ण