ताई तू राज्य सांभाळ मी परळी बघते, पंकजा मुंडेंचे ब्रह्मास्त्र

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघातील राजकीय हालचालींना गती मिळाली आहे. परळी विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा चुरशीची लढत पाहिला मिळणार आहे. कारण भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघे बहिण भाऊ आमने सामने येणार आहेत. त्यामुळे राज्यातली ही हायव्होल्टेज लढाई असणार आहे. तर या लढाईत आता खा. डॉ. प्रीतम मुंडेही उतरल्या आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीत पंकजा मुंडेंचे ब्रह्मास्त्र म्हणजेच प्रतीम मुंडे मैदानात उतरत असल्याची चर्चा आहे.

जसजशी निवडणुक जवळ येत आहे. तसतशी मुंडे – बहिण भावातील आरोप – प्रत्यारोप वाढत आहेत. मात्र आता पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी खा. डॉ. प्रीतम मुंडे ही उतरल्या आहेत. बहिणीच्या प्रचाराला उतरताच प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले आहे. वैद्यनाथवर बोट दाखवणारा.. जगमित्र सूतगिरणी, जगमित्र शुगर फॅक्टरीमध्ये मृतांच्या नावावरच्या जमिनी लाटल्या. त्या शेतकऱ्यांना आगोदर न्याय द्या, असा सवाल करत प्रीतम मुंडेंनी गंभीर आरोप केले आहेत.तसेच पंकजा मुंडे यांनी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून केलेली विकास कामे केली जेवढा विकास गेल्या पंधरा वर्षांत केला नाही. तो ताईंनी केवळ पाच वर्षांत केला, असा प्रीतम मुंडे दावा केला आहे.

दरम्यान धनंजय मुंडे हे परळीतून लढणार असल्याचे निश्चित झाले आहे, त्यामुळे २०१४ प्रमाणे पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध मुंडे लढाई परळीकरांना पहायला मिळणार आहे. मागील निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा २५ हजार मतांनी पराभव केला होता. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी धनंजय मुंडे यांनी कंबर कसल्याचं दिसत आहे.पंकजा मुंडे या सध्या राज्य मंत्रीमंडळात ग्रामविकास मंत्री म्हणून काम पाहत आहेत. मागील पाच वर्षात त्यांनी कोट्यावधींचा निधी खेचून आणला आहे. मात्र २०१६ मध्ये परळी नगरपालिका आणि २०१७ मध्ये पंचायत समिती निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांचा आत्मविश्वास वाढला आहे.