जोतीरादित्य सिंधीयांनी प्लाज्मा दान करून आपल्या परोपकारी वृत्तीचे दर्शन घडवले – प्रितम मुंडे

pritam munde - sincdiya

भोपाळ : भाजप नेते व राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गुरुवारी प्लाझ्मा दान केला. विशेष म्हणजे संसर्गातून बरे झालेल्या लोकांना सरकार त्यांचे प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करीत आहेत, ज्यामुळे कोरोना संक्रमित लोकांच्या उपचारांमध्ये मदत होऊ शकते. सिंधिया म्हणाले की देशवासियांच्या जीवाचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात, सिंधिया आणि त्यांची आई माधवी राजे सिंधिया कोरोना संक्रमित असल्याचे आढळले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दिल्लीच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर दोघेही बरे झाले.

जून महिन्यात जोतीरादित्य सिंधिया यांच्या घश्यात खवखव आणि ताप जाणवल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. याशिवाय त्यांच्या आई माधवी राजे सिंधिया यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र काही दिवसांतच सिंधिया यातून बरे झाले आहेत. त्यानंतर त्यांनी आपला प्लाझ्मा दान केल्याने देशभरातून सिंधिया यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान यावर भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी ज्योतिरादित्य सिंधिया याचं अभिनंदन केलं आहे. ‘मध्य प्रदेश भाजपचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कोरोनाशी यशस्वी लढा दिल्या नंतर प्लाज्मा दान केले आहे याबद्दल त्यांचे खुप खुप अभिनंदन. कोरोना आजारातून बरे झालेल्या सर्वांनी प्लाज्मा दान करून गंभीर आजारी असलेल्या गरजू रुग्णांना मदत करावी. कोरोनाशी दोन हात करून बरे झालेले कोरोना योद्धे प्लाज्मा दान करून आपल्या परोपकारी वृत्तीचे दर्शन घडवून जीवनदायी सेवाभावाचा आदर्श जगासमोर ठेवतील हा विश्वास आहे’.

मध्य प्रदेश भाजपचे खासदार श्री.ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कोरोनाशी यशस्वी लढा दिल्या नंतर प्लाज्मा दान केले आहे याबद्दल…

Posted by Dr Pritam Gopinath Munde on Friday, July 10, 2020