‘पंतप्रधान किसान सन्मान योजनाही फसवीच; ७५% शेतक-यांना या योजनेचा पूर्ण लाभ मिळाला नाही’

टीम महाराष्ट्र देशा – मोदी सरकारच्या इतर योजनांप्रमाणेच पंतप्रधान किसान सन्मान योजनाही फसवीच आहे. ७५% शेतक-यांना या योजनेचा पूर्ण लाभ मिळाला नाही. शेतक-यांना दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकार त्यांची फसवणूकच करत आहे. अशा आशयाचे ट्वीट करत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी द वायर या वृत्त संस्थेकडून प्रकाशित एक रिपोर्टही शअर केला आहे.

Loading...

मोदी सरकार हेच देशावरील सगळ्यात मोठा बोजा : बाळासाहेब थोरात

नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर देशावरील कर्जात सातत्याने वाढ होत आहे.सध्या देशावरील कर्जामध्ये ७१ टक्क्यांची वाढ झाल्याचा आरोप काँग्रेसच्या प्रवक्ते गौतम वल्लभ यांनी केला होता.यावर महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर मोदी सरकार हाच सगळ्यात मोठा बोजा आहे अशी टीका केली आहे.

गेल्या साडे पाच वर्षांत देशावरील कर्जाचा बोजा ७१ टक्क्यांनी वाढला असल्याचा आरोप काँग्रेसेचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी केला होता. तसेच हा बोजा उतरवणार कसा, असा सवालही त्यांनी केला होता.

मार्च २०१४ मध्ये एकूण कर्ज ५३.११ लाख कोटी रुपये होते, ते सप्टेंबर २०१९ मध्ये ९१.०१ लाख कोटी रुपयांवर गेले. कर्जात ३७.९ लाख कोटींची वाढ (७१.३६ टक्के) झाली. म्हणजेच प्रति माणशी कर्जाचे प्रमाण ४१,२०० रुपयांवरून ६८,४०० रुपयांवर गेले. कर्ज प्रति माणशी २७,२०० रुपयांनी वाढले. साडेपाच वर्षांमध्ये प्रति माणशी कर्जाचे प्रमाण ६६ टक्के म्हणजे दरवर्षी १०.३ टक्क्य़ांनी वाढले.

यावर बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. नरेंद्र मोदी सरकारने पाच वर्षात देश दिवाळखोरीत काढला आहे. या सरकारला कुठलेही धोरण वा दिशा नसल्यामुळे आर्थिक आणीबाणी ओढवली आहे. त्यातूनच कर्जाचा बोजा वाढला आहे. खरे म्हणायचे तर मोदी सरकारच देशावरचा सर्वात मोठा बोजा आहे, अशी टीका खुमासदार टीका थोरात यांनी केली.

हेही बघा – 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'