पंतप्रधानांचा ७० वा वाढदिवस अन सत्तरहून अधिकांचे रक्तदान, कुठे घडले हे सत्कर्म  

rakat dan shibir

नवेगाव बांध : पक्षी निरीक्षणासाठी जगात प्रसिद्ध झालेल्या नवेगाव बांध येथील गावकऱ्यानी अनोख्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७० व्या वाढदिवस साजरा केला आहे. देशावर असेलेले कोरोनाचे संकट बघता भारतीय जनता पक्ष अर्जुनी मोरच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, ज्यात किमान सत्तरहून अधिक दाते रक्तदान करतील अशी व्यवस्था करण्यात आली होती. माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात ‘सेवा सप्ताह’ अंतर्गत ग्रामीण रुग्णालय नवेगाव बांध येथे हे शिबीर  झाले.

यावेळी प्रदेश सदस्य रचना गहाणे, जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर, रघुनाथ लांजेवार, तालुका महामंत्री नुतन सोनवाने, विजया कापगते, शितल राऊत, खुशाल काशिवार, अन्ना पाटिल डोंगरवार, महादेव बोरकर, व्यंकट खोब्रागडे, विनोद नाकाडे उपस्थित होते व युवा मोर्चा अर्जुनी मोर अध्यक्ष विवेक खंडाईत, संदीप कापगते, होमराज पुस्तोडे, दिपकर उके, सतिश कोसरकर, बाळु डोंगरवार आदींनी उपस्थित राहून रक्तदान शिबीर यशस्वी केले.

महत्वाच्या बातम्या :-