जेंव्हा इस्त्रायलचे पंतप्रधान ‘जय महाराष्ट्र’ म्हणतात

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतानाहू हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान गुरुवारी झालेल्या शालोम बॉलीवूड कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. यावेळी बॉलीवूडमधील अनेक सितारे उपस्थित होते.

बेंजामिन नेतानाहू यांनी यावेळी बोलताना संपूर्ण जग ज्या प्रमाणे बॉलीवूड प्रेम करते तसेच इस्त्रायलही प्रेम करत असल्याच यावेळी त्यांनी सांगितले. तर बॉलीवूडचे तोंडभरुन कौतुक करायलाही ते विसरले नाहीत.

दरम्यान या कार्यक्रमातील विशेष म्हणजे नेतानाहू यांनी दिलेला जय महाराष्ट्राचा नारा. आपले भाषण संपताना बेंजामिन नेतानाहू जय हिंद, जय महाराष्ट्र, जय इस्त्रायल म्हणत नाराही दिला. या कार्यक्रमाला बिग बी यांच्यासह ऐश्वर्या, अभिषेक बच्चन, करण जोहर, सुभाष घई, इम्तियाज अली, रॉनी स्क्रूवाला, सारा अली खान आणि इतर सेलिब्रेटी उपस्थित होते.