fbpx

पंतप्रधान मोदींची केली कमळाच्या फुलांनी तुला

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळ दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी केरळच्या पारंपारिक पोशाखात कोची विमानतळावर आगमन केल. तर या दौऱ्यावर आले असता मोदींनी श्रीकृष्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतले, मंदिरात त्यांच्या पुजाअर्चेसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. यावेळी पंतप्रधानांची कमळाच्या फुलांनी तुला सुद्धा करण्यात आली.

दरम्यान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर आपल्या पहिल्या विदेश यात्रेसाठी मालदीव आणि श्रीलंकेला जात आहेत. शनिवारी मोदी मालदीवच्या संसदेला संबोधित करणार आहेत. तसेच मोदी हे दुसऱ्यांदा मालदीव चालले आहेत. मोदी गेल्या वर्षी राष्ट्रपति इब्राहीम मोहम्मद सोलीह यांच्या शपथविधी सोहळ्याला गेले होते. मोदी सरकारची नेबर फर्स्ट (पड़ोसी पहिले) की पॉलिसी चालू आहे. २०१४ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान बनले तेव्हा मोदी त्यांच्या पहिल्या विदेश दौऱ्या साठी भूतानला गेले होते.