‘पंतप्रधान ‘या’ दोन गोष्टींबद्दल कधीच बोलत नाहीत’,असदुद्दीन ओवेसींचा मोदींना टोला

‘पंतप्रधान ‘या’ दोन गोष्टींबद्दल कधीच बोलत नाहीत’,असदुद्दीन ओवेसींचा मोदींना टोला

owaisi

नवी दिल्ली: एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाना साधला आहे. पंतप्रधान सर्व गोष्टींबद्दल बोलतात, परंतु ते दोन गोष्टींबाबत कधीच बोलत नाही. पहिलं म्हणजे इंधनाच्या दराने गाठलेली शंभरी आणि दुसरं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी आक्रमकतेमुळे निर्माण झालेला धोका याबाबत मोदी बोलत नाहीत. असे त्यांनी म्हटले आहे.

जेव्हा पाकिस्तानने पुलवामावर हल्ला केला, तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले ‘घर मे घुसके मारेंगे’ आता चीन आमच्या अंगणात येऊन बसला आहे आणि मोदी मात्र काहीच करत नाही. असा घणाघातही ओवैसी यांनी केला आहे.

गेल्या आठवड्यात काश्मीरमध्ये अनेक नागरिकांची हत्या करण्यात आली, तसेच पूंछमधील चकमकीत लष्कराच्या नऊ जवानांचा मृत्यू झाला. आपले सैनिक काश्मीमध्ये मारले गेले आणि आपण २४ ऑक्टोबरला पाकिस्तान सोबत टी -२० सामना खेळणार आहोत. असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या