हिंसाचाराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून निषेध

indian-pm-narendra-modi

नवी दिल्ली : डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यांना न्यायालयाने बलात्कार प्रकरणी दोषी ठरवल्यानंतर उसळलेल्या हिंसाचाराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध केला आहे.

‘हिंसाचाराच्या घटना अतिशय दुर्दैवी आणि दु:खदायक आहेत . समाजातील सर्व घटकांनी शांतता पाळावी. मी कायदा आणि सुव्यवस्था स्थितीवर स्वात: लक्ष ठेवून आहे. केंद्रीय गृह सचिवांकडून मी परिस्थितीची माहिती घेत आहे. हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असे मी सांगितले आहे, ‘ असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.