शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आज मिळणार पीएम किसान योजनेचा आठवा हप्ता…

pm kisan

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा आठवा हप्ता जारी करणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते आज सकाळी 11 वाजता संवाद साधणार आहेत. पंतप्रधान कार्यालयानुसार (पीएमओ) आज 9.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हजार कोटींहून अधिकची रक्कम वळती केली जाणार आहे. या वेळी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमरदेखील उपस्थित राहणार आहेत.

पीएम किसान योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातात. हे पैसे 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये वळते केले जातात. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकली जाते. आतापर्यंत 1.15 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत.

याबाबत माहिती देताना विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना आणि पीएम-किसान या लोकप्रिय योजनेत आठवा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे. अस सांगितलय. 14 मे 2021 सकाळी 11 वाजता 9.5 कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना 19,000 कोटी रुपये वितरीत होणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याची रक्कम 25 डिसेंबर 2020 पासून मिळण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये जमा केले जातात. आतापर्यंत 9 कोटी 41 लाख शेतकऱ्यांना सातवा हप्ता मिळाला आहे. या योजनेमध्ये पहिला हप्ता हा 1 डिसेंबर 31 ते मार्च या कालावधीत दिला जातो. तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलैपर्यंत दिला जातो. शेतकऱ्यांना खात्यात तिसऱ्या हप्त्याचा लाभ 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत मिळतो.

महत्वाच्या बातम्या 

IMP