सव्वाशे कोटी जनतेच्या जीवनात बदल घडवून आणण्याशिवाय माझ्याकडे दुसरे कामच काय ? – पंतप्रधान

टीम महाराष्ट्र देशा : माझ्याकडे दुसरे काम तरी काय आहे? माझा देश, येथील सव्वाशे कोटी जनतेच्या जीवनात बदल घडवून आणणे हेच माझे एकमेव ध्येय आहे. जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता निर्देशंकात भारताने जी झेप घेतली आहे, ती कामगिरी यापूर्वीच करता येणे शक्य होते.

भारताची आजची परिस्थिती अजून चांगली झाली असती. यापूर्वी दिवाळखोरी आणि बुडीत कर्जासंबंधी नियमांमध्ये योग्य सुधारणा झाली असती तर हे भाग्य तुमच्याच वाट्याला आले नसते का?, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना विचारला आहे. ते शनिवारी दिल्लीतील प्रवासी भारतीय केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

जागतिक बँकेच्या अहवालातील व्यवसाय सुलभता निर्देशांकात भारताने केलेल्या प्रगतीचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. आता जागतिक बँकेच्या अहवालावरून आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा आपण सगळ्यांनी देशाच्या विकासासाठी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत, असे मोदींनी सांगितले.

आताच्या इतकी व्यवसाय सुलभता भारतात यापूर्वी कधीच नव्हती- नरेंद्र मोदीLoading…
Loading...