देशातील शास्त्रज्ञांवर विश्वास दाखविण्याची आवश्यकता असताना मोदींकडे राष्ट्रवादीने केली ‘ही’ अजब मागणी

malik-modi

मुंबई – कोरोनावर मात करण्यासाठी भारतात सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींना आपत्कालीन वापरासाठी संमती देण्यात आलेली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच या दोन्ही लशींना मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष लसीकरणाला कधी सुरुवात होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं.

त्यानंतर आज अखेर तो ऐतिहासिक दिवस उजेडाला आहे ज्याची गेल्या वर्षभरापासून लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधून कोविशील्ड लसीचे सहा कोल्ड स्टोअरेज कंटेनरपैकी तीन कंटेनर पुणे विमानतळाच्या दिशेने पोलिस बंदोबस्तामध्ये 4 वाजून 55 मिनिटांनी रवाना झाले आहेत.

या कामगिरीचे देशच नव्हे तर जगभरातून कौतुक होत आहे.या अश्या कठीण काळात खरतर देशातील शास्त्रज्ञांवर विश्वास दाखविण्याची आवश्यकता असताना विरोधक मात्र हीन पातळीचे राजकारण करताना दिसून येत आहेत. कोरोना लसीकरणाबाबत जनतेच्या मनात शंका आहे असे चित्र उभा करण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधक करत आहेत यातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लस घेऊन कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

१६ जानेवारीपासून देशभरात कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात होणार आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी, सैन्यदल यातील लोकांना लसीकरण केले जाणार आहे. परंतु या लसीकरणाबाबत जनतेच्या मनात शंका आहे. त्यामुळे जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस टोचून घेतली तर जनतेच्या मनातील भीती निघून जाईल असेही नवाब मलिक म्हणाले.

महत्वाच्या बातम्या