मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या बुधवारच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेत गंभीर चूक घडल्यावरून मोठे वादळ उठले आहे. यामागे मोठे कटकारस्थान होते, असा दावा करत भाजपने पंजाब सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही चूक नसल्याचे राज्य सरकार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले आहे. त्यामुळे देशातील राजकारण चांगलेच तापले आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते तसेच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक होणे ही गंभीर बाब आहे. या प्रकरणाचा केंद्र किंवा राज्य सरकारने तपास न करता हायकोर्टाच्या सिटींग न्यायाधीशांच्या माध्यमातून तपास व्हावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.
या प्रकरणी आता भाजप (BJP) आणि कॉंग्रेस (Congress) राजकारण करत आहे यावर बोलताना नवाब मलिक म्हणाले, सुरक्षेची जबाबदारी एसपीजी, आयबी आणि राज्य सरकारचे पोलीस या तिघांची असते. त्यामुळे चूक कुणाकडून झाली हे जेव्हा हायकोर्टाच्या सिटींग न्यायाधीशांच्या माध्यमातून तपास होईल तेव्हा सत्य काय आहे हे देशाच्या जनतेसमोर येईल, असे नवाब मलिक म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कोरोनाची लागण
- ‘सलमान खानने केली फसवणूक, त्याच्यासाठी भारतात…’ सोमी अलीने केला खुलासा
- भाजपचा ‘तो’ दावा ठरला फोल; प्रत्यक्षात स्थिती मात्र वेगळी
- “पत्रकारांवर खटले दाखल करून, त्यांना अटक करणाऱ्या सूडबुद्धी ठाकरे सरकारचे डोके ठिकाणावर येवो”
- ५५ हजार एसटी कर्मचाऱ्यांना नोटीस देणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?- अतुल भातखळकर
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<