fbpx

पंतप्रधान नरेंद्र मोदींची केरळला 500 कोटींची मदत

indian-pm-narendra-modi

टीम महाराष्ट्र देशा – केरळमध्ये आलेल्या महापुरात आजपर्यंत तीनशेच्या वर बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच अडीच लाखांवर नागरिक बेघर झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. तत्पूर्वी मुख्यमंत्री पिनराई विजयन, केंद्रीय मंत्री के. जे. अल्फान्स यांचाशी झालेल्या बैठकीमध्ये मोदी यांनी केरळला दिली 500 कोटींची तातडीची मदत जाहीर केली.

याआधी 100 कोटींची मदत देण्यात आली होती. याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा केली.

चालता-बोलता विश्वकोष काळाच्या पडद्याआड गेला : सुप्रिया सुळे