fbpx

पाकिस्तानची नाचक्की, मोदींनी ‘त्या’ पत्रात चर्चेचा उल्लेख केलाच नव्हता

टीम महाराष्ट्र देशा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून एक पत्र पाठवले होते. मात्र नेहमीच्या सवयी प्रमाणेच पाकिस्तानने खोटं बोलत या पत्रातून इम्रान खान यांना चर्चेसाठी आमंत्रण दिल्याची थाप त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मारल्याचं स्पष्ट झालं आहे.

भारत आणि पाकिस्तान या शेजारी राष्ट्रांमध्ये चर्चा होणे गरजेचे असल्याचे सांगतानाच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना पत्र पाठवून चर्चेसाठी आमंत्रण दिल्याचा दावा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी केला होता.

मात्र हा दावा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानंच फेटाळून लावला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पत्रातून मोदींनी इम्रान खान यांचं अभिनंदन केलं, तसेच दोन देशांनी भविष्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करावी, असं पत्रात नमूद असल्याचं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

स्वातंत्र्यदिनासाठी नव्हे बकरी ईदच्या दिवशी घातपात करण्याचा कट होता : आझमी