fbpx

पंतप्रधान नरेंद्र मोदी बेपत्ता

वेबटीम : देशात पोस्टर्स बाजी मुळे राजकारण ढवळून निघाले आहे. काही दिवसांपूर्वी अमेठीत राहुल गांधी बेपत्ता अशा आशयाचे पोस्टर्स लागले होते. त्यानंतर नंबर लागला तो म्हणजे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा त्यांच्या रायबरेली येथील मतदार संघात सोनिया गांधी हरवल्या असल्याचे पोस्टर्स पहायला मिळाले आणि आता अगदी असाच प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत घडला आहे. वाराणसी या लोकसभा मतदारसंघात मोदी हे बेपत्ता असल्याचे पोस्टर लावण्यात आले आहेत. हे पोस्टर कोण लावले आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. खुद्द पंतप्रधानांच्या मतदारसंघात असा प्रकार घडल्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांच्या पायाखालची जमीनच हालली आहे. लाचार, हताश काशीवासियांकडून हे पोस्टर लावण्यात आल्याचे त्यावर लिहिण्यात आले आहे. आता या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपासकेला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही पडताळून पाहिले जात आहेत

‘जाने वह कौन सा देस जहां तुम चले गए’, असे लिहिलेल्या पोस्टरवर मोदींचे छायाचित्र आहे. वाराणसीत यांना मत मागताना शेवटचे पाहिले होते. तेव्हापासून ते बेपत्ता आहेत. ते बेपत्ता असल्यामुळे नाईलाजाने गुन्हा दाखल करावा लागत आहे, असे या पोस्टरवर लिहिले आहे. त्यामुळे अश्या पोस्टर्स बाजानमुळे प्रशासन चांगलेच कामला लागले आहे.