पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली विद्यार्थ्यांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’

narendra modi

नवी दिल्ली : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षे पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर देऊन त्यांच्या शंकांचं निरसनही केलं. यावेळी त्यांनी फावल्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा याचा कानमंत्रंही दिला. फावल्या वेळेला फावला वेळ समजू नका. फावला वेळ हा तुमच्यासाठी खजिना आहे. रिकामा वेळ म्हणजे एक प्रकारचं सौभाग्यच आहे. फावला वेळ नसेल तर आयुष्य रोबोट सारखं होऊन जातं, असं सांगतानाच जर झोपाळ्यावर झुलायची इच्छा होत असेल तर बिनधास्तपणे झोक्यावर बसण्याचा आनंद घ्या. मला फावल्यावेळेत झोपाळ्यावर झुलायला आवडतं. मी झोपाळ्यावर बसतो. त्यातून मला आनंद मिळतो, असं मोदी म्हणाले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शालेय-महाविद्यालयीन परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांशी खास संवाद साधला. मुलांना तणामुक्त होऊन परीक्षा कशी द्यायची याचा कानमंत्र देतानाच आनंदी आणि उत्साही राहण्याचं गुपितही सांगितल आहे. परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाअंतर्गत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जगभरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी पीएम मोदी यांनी व्हर्च्युअल मोडमध्ये विद्यार्थ्यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी व्हिडिओ जारी करीत विद्यार्थ्यांना परीक्षा आयुष्यातील स्वप्नांचा शेवट म्हणून नव्हे तर संधी म्हणून पहा असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना पंतप्रधान मोदींनी बर्‍याच टिप्सही दिल्या. या दरम्यान, पंतप्रधान मोदींनी पालकांना सल्ला दिला की, मुलांना अटकाव करण्याऐवजी त्यांना उत्तेजन द्या. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर देऊन त्यांच्या शंकांचं निरसनही केलं. यावेळी त्यांनी फावल्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा याचा कानमंत्रंही दिला. फावल्या वेळेला फावला वेळ समजू नका. फावला वेळ हा तुमच्यासाठी खजिना आहे. रिकामा वेळ म्हणजे एक प्रकारचं सौभाग्यच आहे. फावला वेळ नसेल तर आयुष्य रोबोट सारखं होऊन जातं, असं सांगतानाच जर झोपाळ्यावर झुलायची इच्छा होत असेल तर बिनधास्तपणे झोक्यावर बसण्याचा आनंद घ्या. मला फावल्यावेळेत झोपाळ्यावर झुलायला आवडतं. मी झोपाळ्यावर बसतो. त्यातून मला आनंद मिळतो, असं मोदी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या