Narendra Modi | “वो अब चल चुके है, वो अब आ रहे है”; भर लोकसभेत पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर टीका

Narendra Modi | नवी दिल्ली : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत 100 दिवसांची भारत जोडो यात्रा केली. त्यांच्या याच यात्रेवरुन आज लोकसभेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राहुल गांधी यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. यावेळी त्यांनी राहुल गांधींची चांगलीच खिल्ली उडवली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आज सातवा दिवस आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या अभिभाषणावर अभिनंदन प्रस्तावर सत्ताधारी-विरोधकांची चर्चा झाल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेला उत्तर दिले आहे.

“आपली ऋची, प्रवृत्ती आणि प्रकृतीनुसार प्रत्येकाने आपले म्हणणे मांडले. वेगवेगळे आकडे सादर करण्यात आले. यावरुन कुणाची किती समज आहे, त्यांचा उद्देश काय आहे, हे देखील समोर आले आहे. देश त्याची चिकित्सा करेलच. चर्चेत सहभागी झालेल्यांचे आभार मानतो.”, अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली आहे.

“वो अब चल चुके है, वो अब आ रहे है” (PM Modi Comment On Rahul Gandhi)

“अनेक लोकांनी आपापले आकडे दिले. काहींनी स्वतःचा तर्क मांडला. या भाषणांवरुन कुणाची किती क्षमता आहे, कुणाची किती योग्यता आणि समज आहे, हे लक्षात येते. काल काही लोकांच्या भाषणानंतर पूर्ण इकोसिस्टिम, समर्थक उड्या मारत होते. अनेकजण भाषणाचे कौतुक करत होते. कदाचित त्यांना काल रात्री चांगली झोप लागली असेल. आज कदाचित ते उठले देखील नसतील. अशा लोकांसाठी बोलले जाते, ‘ये केह केहकर हम, दिल को बेहला रहे है, वो अब चल चुके है, वो अब आ रहे है” अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा सभागृहात भाषणासाठी आले. त्यावेळी भाजपच्या खासदारांकडून जय श्रीरामचे नारे देण्यात आले. मोदींनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला राष्ट्रपतींचे आभार मानले, तसेच ‘देशाला एक ध्येयाकडे नेणारे भाषण दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन’ असे नरेंद्र मोदी म्हणाले. “मी सर्वांचे भाषण ऐकत होतो. त्यामध्ये राष्ट्रपतींच्या भाषणावर कोणाला बोलण्यात रस दिसत नव्हता. भाषणावर कुणीही चर्चा केली नाही.”, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

राहुल गांधी काय म्हणाले होते?

उद्योजक गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील नाते काय, असा थेट प्रश्न करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी संसदेत हल्लाबोल केला होता. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर झालेल्या चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.

“मोदी-अदानी यांच्यामध्ये साटेलोटे असून दोघेही एकमेकांना फायदा करून देतात. अदानींनी 20 वर्षांमध्ये मोदींना व भाजपला किती पैसे दिले, असा प्रश्न गांधी यांनी विचारला. मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर जाऊन येतात आणि संरक्षण क्षेत्रातील अनेक कंत्राटे अदानींच्या कंपन्यांना मिळतात. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना देशातील उद्योगजगत त्यांच्या विरोधात होते. त्या काळात अदानी मोदींच्या पाठीशी उभे राहिले. तेव्हा त्यांचे नाते स्थानिक होते, मग गुजरातव्यापी झाले. मोदी पंतप्रधान झाल्यावर हे नाते राष्ट्रीय झाले, आता तर ते आंतरराष्ट्रीय झाले आहे”, असे राहुल गांधी म्हणाले होते.

नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका (PM Narendra Modi Criticize Congress) 

‘2004 ते 2014 हे दशक स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक घोटाळ्यांचे दशक होते. त्याच वेळी, 10 वर्षे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यात दहशतवादी हल्ले सुरूच होते. अनोळखी वस्तूला हात लावू नका ही माहिती पुढे जात राहिली. 10 वर्षात काश्मीरपासून ईशान्येपर्यंत फक्त हिंसाचार झाला. जागतिक व्यासपीठावर भारताचा आवाज इतका कमकुवत होता की जग ऐकायला तयार नव्हते. त्यांच्या निराशेचे कारण म्हणजे आज जेव्हा देशातील 140 कोटी जनतेची क्षमता फुलत आहे. 4 ते 14 पर्यंत त्याने ती संधी गमावली आणि प्रत्येक संधीचे संकटात रूपांतर केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button