पंतप्रधान नरेंद्र मोदी परवडले पण …

RAJ THACKERAY

टीम महाराष्ट्र देशा – एकवेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी परवडले पण मोदीभक्त नकोत अश्या शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका झाली रे झाली की भक्त बोलायला लागतात. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात बोलायचे नाही अशीच भूमिका घेतली जाते. त्यामुळे एकवेळ मोदी परवडले पण भक्त नको रे बाबा असा टोला आज राज ठाकरेंनी औरंगाबादमध्ये भाजपला लगावला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याला गुरुवारपासून सुरुवात झाली. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केले.
राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे-

– त्रिपुरातही भाजपाचा विजय हा काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात घेतल्याने झाला. पण संघाच्या ४० वर्षांच्या मेहनतीमुळे हा विजय शक्य झाल्याचा खोटा दावा भाजपाकडून केला जातो.

-भाजपावाले रोज खिडकीत बसतात आणि तू येतो का, असं दुसऱ्या पक्षातील लोकांना विचारत बसतात. त्यांना दुसऱ्यांच्या मुलांना कडेवर घेऊन फिरण्याची हौस आहे.

– मोदी टुर्स अँड ट्रॅव्हल्सने परदेशवारी केल्या. पण परदेशातून एकही रुपया देशात यायला तयार नाही. आता निवडणुका जिंकणे कठीण दिसत असल्याने भाजपाकडून राम मंदिराचा विषय पुढे रेटला जात आहे.

– पैसा आणि ईव्हीएमच्या जिवावरच हा पक्ष निवडून येत आहे. निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशिन बंद करुन पुन्हा मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे. मग भाजपाला त्यांचा जागा कळेल.

मुंबईतल्या मुलुंडमध्ये धडाडणार ठाकरी तोफ !

मुंबईतल्या मुलुंडमध्ये धडाडणार ठाकरी तोफ !