नवी दिल्ली: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांनी आज वयाची शंभरी गाठली आहे. यानिमित्तानेच नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या गांधीनगर येथील निवासस्थानी भेट देत आईची भेट घेतली आहे. आईचे चरणस्पर्श करत मोदींनी आईचे आशीर्वादही घेतले.
दरम्यान केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ८ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. मोदींच्या नेतृत्वात भाजप सरकारला ८ वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र भाजप विरुद्ध विरोधी पक्ष असा संघर्ष रोजच पहावयास मिळत असतो. दरम्यान येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी भाजप तसेच विरोधी पक्षाकडून तयारी सुरु असल्याचे दिसून येत आहे.
Took blessings of my mother today as she enters her 100th year… pic.twitter.com/lTEVGcyzdX
— Narendra Modi (@narendramodi) June 18, 2022
तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी हे गोंधळलेले पंतप्रधान आहेत अशी जनतेची धारणा होऊ लागली आहे. अनेक मोठ्या योजना आणि धोरणे आणण्याचा उत्साह केंद्र सरकार दाखवत असले तरी प्रत्यक्षात ठोस कृतिशील आखणी नसल्याने अनेकदा या योजनांमध्ये बदल करावे लागले तर अनेक योजना सपशेल अपयशी ठरल्या आहेत. अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्वीटरवर पोस्ट करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- पंतप्रधान मोदी आतापर्यंतचे सर्वाधिक गोंधळलेले पंतप्रधान; ‘राष्ट्रवादी’ची टीका
- पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ध्वनी प्रदूषणाची समस्या; सुप्रिया सुळेंनी केली गडकरींकडे ‘ही’ मागणी
- IND vs SA 4th t20 : भारताचं दमदार कमबॅक..! दक्षिण आफ्रिकेला ८२ धावांनी हरवत मालिकेत साधली बरोबरी
- IND vs SA 4th T20 : वय फक्त आकडाच..! तब्बल १६ वर्षानंतर कार्तिकनं ठोकलं पहिलं अर्धशतक; वाचा!
- IND vs SA 4th T20 : वय फक्त आकडाच..! तब्बल १६ वर्षानंतर कार्तिकनं ठोकलं पहिलं अर्धशतक; वाचा!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<