पंतप्रधान मोदींनी पत्र लिहित आईच्या निधनानंतर अक्षयचे केलं सांत्वन

अक्षय कुमार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याची आई अरुणा भाटिया यांचे ८ सप्टेंबर रोजी निधन झाले. कतेच अक्षयने सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत हि माहिती दिली होती. मनोरंजन क्षेत्रातून देखील अनेक कलाकारांनी अक्षयच्या आईला श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पत्र लिहित शोक व्यक्त केला आहे.

अक्षय कुमारने नरेंद्र मोदी यांनी लिहिले पत्र इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. पत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्षय कुमारच्या आईचे निधन झाले त्या दिवशी देखील बोलणे झाल्याचे म्हटले आहे. तसेच मोदींनी पत्रात अक्षय कुमारच्या भारतीय चित्रपटसृष्टीत ठसा उमटवण्याच्या अनेक दशकांच्या संघर्षाचे कौतुक केले आणि त्याचे श्रेय त्याच्या पालकांना दिले आहे.

तसेच हे पत्र अक्षयने शेअर करत लिहिले की, ‘आईच्या निधनाबद्दल शोकसंदेश दिल्यामुळे मी सर्वांचा आभारी आहे. माझ्या दिवंगत पालकांबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी आणि वेळ दिल्याबद्दल माननीय पंतप्रधानांचे आभार. हे सांत्वनदायक शब्द माझ्याबरोबर कायम राहतील’.

अक्षयने आईंच्या निधनानंतर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लिहिले होते की,  ‘ती माझं सर्वस्व होती आणि आज तिच्या जाण्याने मला अत्यंत दु:ख झाले आहे. माझी आई अरुणा भाटियाने आज सकाळी हे जग सोडलं. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. या कठीण काळात तुम्ही केलेल्या प्रार्थनांचा मी आदर करतो’. तसेच नुकतेच अक्षयने त्याच्या वाढदिवसादिवशी देखील आईसाठी पोस्ट लिहिली होती.

महत्त्वाच्या बातम्या