पंतप्रधान मोदींनी लसीचा दुसरा डोस घेताना मागच्यावेळी झालेली ‘ती’ चूक टाळली

narendra modi

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात कोविड प्रतिबंधात्मक लसीची दुसरी मात्रा घेतली. पुद्दुचेरीच्या पी. निवेदा आणि पंजाबच्या निशा शर्मा या दोन परिचारिकांनी पंतप्रधानांना लस टोचली.

कोरोना संकटाच्या लढाईत लसीकरण हा प्रभावी उपाय असून जे जे या लसीकरणासाठी पात्र आहेत त्यांनी कोविन cowin.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून लवकरात लवकर लस घ्यावी असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोनाविरोधी लस ‘कोव्हॅक्सीन’चा दुसरा डोस मुळच्या पंजाबच्या असलेल्या नर्स निशा शर्मा यांनी दिली. त्यांच्यासोबत पुडुचेरीच्या सिस्टर पी निवेदा उपस्थित होत्या. पीएम मोदी यांना जेव्हा कोरोनाविरोधी लसीचा पहला डोस दिला होता, तेव्हा देखील पी निवेदा उपस्थित होत्या. सिस्टर निवेदा म्हणाल्या की मला दुसऱ्यांदा पंतप्रधानांना भेटण्याची संधी मिळाली. छान वाटलं, आम्ही सोबत फोटो देखील घेतला.

दरम्यान, मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्स रुग्णालयातच कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यावेळी करण्यात आलेल्या फोटोसेशनमध्ये नरेंद्र मोदींचा विनामास्क चेहरा चर्चेचा विषय ठरला होता. यावेळी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसरा डोस घालताना तोंडावर मास्क घातल्याचे दिसून आले. त्यामुळे आता मोदींच्या टीकाकारांना त्यांच्यावर टीका करण्यास कोणताही मुद्दा मिळणार नाही.

महत्वाच्या बातम्या