पंतप्रधान मोदींमुळे हाल… जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी

टीम महाराष्ट्र देशा– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणमध्ये मेट्रोच्या भूमिपूजनासाठीची उपस्थिती चांगलीच वादग्रस्त ठरली आहे. पंतप्रधान मोदी ज्या फडके मैदानात सभा घेणार आहेत, तिथून जवळच असलेल्या ठिकाणी होणारी लग्नं आधी तडकाफडकी रद्द झाली. तर नंतर मैदानाजवळ असलेल्या लालचौकी स्मशानभूमीलाही टाळं ठोकण्यात आलंय.

Loading...

मोदी कल्याणमध्ये असेपर्यंत कुणाचं निधन झालंच, तर दुःखी-कष्टी कुटुंबीयांना लांब, बैलबाजारातल्या किंवा आणखी लांबवरच्या गणेशघाट स्मशानभूमीपर्यंत जाऊन अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत. एकूण काय, तर मोदी पंतप्रधान असेपर्यंत कधी तरी अच्छे दिन येतील म्हणून वाट बघणाऱ्या कुणाचा दुर्दैवानं मृत्यू झालाच, तर त्याच्या मृतदेहाचेही हाल अटळ आहेत.Loading…


Loading…

Loading...