भारताची प्रगती कांग्रेस आणि महामिलावटी मित्रांना सहन होत नाही : पंतप्रधान मोदी

टीम महारष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील आणि राज्यातील राजकीय पक्षांनी प्रचार सभांचा चांगलाच धडाका लावला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील राज्य निहाय प्रचार सभा घेऊन भाजपच्या उमेदवारांचा आत्मविश्वास वाढवत आहेत. आज तामिळनाडूतील थेनी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रचार सभा घेतली यावेळी मोदींनी विरोधी पक्षांना लक्ष करत माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

यावेळी मोदी म्हणाले की, पी चिदंबरम आणि त्यांच्या मुलाने देशाला लुटले आहे. जेव्हा ते सत्तेत येतील देश लुटतील. तसेच एयरसेल-मैक्सिस डील मध्ये कार्ति चिदंबरम भ्रष्टाचाराच्या आरोपाचा सामना करत आहेत. तसेच भारताची जगात होत असलेली प्रगती द्रमुक, कांग्रेस आणि त्यांचे महामिलावटी मित्रांना सहन होत नाही. त्यामुळे ते नाराज असल्याचे मोदी म्हणाले.

दरम्यान थेनी येथे झालेल्या प्रचार सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुवादकाच्या मदत घेत जमलेल्या समुदायाला संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस आणि मित्रपक्षांना लक्ष केले असून कॉंग्रेसने महामिलावट केली अशी टीका देखील त्यांनी केली.