fbpx

…आणि पंतप्रधानांनी मानले उद्धव ठाकरेंचे आभार

नवी दिल्ली : केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळात एनडीएचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेला कायमचं भाजपकडून दुय्यम स्थान देण्यात आल्याने, शिवसेना भाजपवर नाराज आहे.आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा देखील शिवसेनेने दिला आहे. मात्र भाजपाकडून आपल्या या जुन्या मित्राची नाराजी दूर करण्याचे, त्यांना गोंजारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं पुन्हा समोर आलंय.

यावेळी तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच ‘मातोश्री’वर फोन करून उद्धव यांचे आभार मानले आहेत. राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार हरिवंश सिंह यांना पाठिंबा दिल्याबद्दल मोदींनी उद्धव ठाकरेंना धन्यवाद दिलेत.

दरम्यान राज्यसभा उपाध्यक्षपदाची काल, गुरुवारी निवडणूक झाली. यामध्ये भाजपप्रणित एनडीएच्या उमेदवाराला 125 मते मिळाली होती. एनडीएच्या उमेदवाराला शिवसेनेही पाठिंबा दिला होता. राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी हरिवंश सिंह यांच्या उमेदवारीला अनुमोदन दिले होते.