…तरीही पंतप्रधान मोदी यांचे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरच्या उमेदवारीला समर्थन

टीम महाराष्ट्र देशा : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे, सामान्य नागरिकही समाज माध्यमांवर साध्वीच्या बेताला वक्तव्याचा निषेध करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीच समर्थन केले आहे.

प्रज्ञासिंह यांची उमेदवारी एका महान संस्कृतीचं प्रतिक असून काँग्रेसला ते महागात पडेल असे गोडवे मोदींनी गायले आहेत.टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी बोलत होते. त्यावेळी त्यांनी साध्वीच्या समर्थनात भाष्य केले आहे. यावेळी मोदी म्हणाले की, प्रज्ञासिंह यांची उमेदवारी ही एका महान संस्कृतीचं प्रतिक आहे. प्रज्ञासिंह यांची उमेदवारी काँग्रेसला महागात पडणार आहे.

दरम्यान साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी मुंबई हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल बेलगाम वक्तव्य केले होते. त्यानंतर, काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांकडून साध्वींच्या या वक्तव्याचा निषेध केला, साध्वी यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह देखील निर्माण केले आहे. तर साध्वी यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली असून ते माझे वैयक्तिक मत असल्याची कबुली दिली आहे.

नेमक काय म्हणाले पंतप्रधान मोदी

“दुनिया मे 5 हजार साल तक जिस महान संस्कृती और परंपराने वसुधै कुटुंबम का संदेश दिया, सर्वेत सुखीना संतु, सर्वे संतु निरायमा का संदेश दिया, जिस संस्कृतीने एकंमसद बहुदा वंदतिका का संदेश दिया, एैसी संस्कृती को आपने आंतकवादी कह दिया. उन सबको जबाव देने के लिए ये सिम्बॉल है, और ये सिम्बॉल काँग्रेस को महंगा पडनेवाला है,”Loading…
Loading...