मनमोहन सिंग अपयशी पंतप्रधान- देवेंद्र फडणवीस

नागपूर- माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे अर्थतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. परंतु, त्यांच्या कार्यकाळात जागतिक पातळीवर भारतीय अर्थव्यवस्था आजच्या तुलनेत बरीच ढासळली होती. याउलट नरेंद्र मोदी हे अर्थतज्ज्ञ नसले तरी त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्रदान केले असून आर्थिक विकास दर उंचावल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर असलेले डॉ. मनमोहन सिंग यांनी तब्बल 10 वर्षे देशाचे पंतप्रधान पद भूषवले. जगातही त्यांचा अर्थतज्ज्ञ म्हणून लौकिक आहे.परंतु, त्यांच्या कार्यकाळात देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती पूर्णपणे ढासळली होती. याउलट अर्थतज्ज्ञ नसलेले नरेंद्र मोदी यांनी सत्तेची सूत्रं हाती घेतल्यानंतर अनेक धाडसी निर्णय घेतले.तसेच विमुद्रीकरणाद्वारे देशातील काळा पैसा बाहेर काढून अर्थव्यवस्थेला मजबुती प्रदान केली. बेहिशेबी मालमत्तांच्या संदर्भात सुमारे 28 वर्षांपूर्वी बनवलेला कायदा नोटीफाय करून नियम तयार करण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे. त्यामुळे डॉ. मनमोहन सिंग हे अपयशी ठरल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना नैराश्याने ग्रासले असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

 

Comments
Loading...