राहुल गांधी पंतप्रधान म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’

टीम महारष्ट्र देशा : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढमध्ये काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशामुळे आता अमेठी मध्ये राहुल गांधी भावी पंतप्रधान असल्याचे पोस्टर लावले जात आहेत. त्यामुळे सध्या अमेठी दौऱ्यावर असलेल्या स्मृती इराणी यांनी या पोस्टर बाबत बोलताना ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ अशी खिल्ली उडवली आहे.

सध्या राहुल गांधी हे कॉंग्रेस कडून उद्याचे पंतप्रधान असल्याची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा मतदार संघ असलेल्या अमेठी येथील रस्त्यांवर ‘भावी पंतप्रधान’ असा उल्लेख असलेले राहुल गांधींचे पोस्टर लावण्यात आले आहेत. त्यामुळे पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या कि स्वप्न पाहण्यास कुठे मनाई आहे. राहुल गांधींच स्वप्नं म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत, अशा शेलक्या शब्दात टोमणा मारला आहे.