भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी पंतप्रधान इम्रान खान यांचा मोठा दावा, म्हणाले…

 भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी पंतप्रधान इम्रान खान यांचा मोठा दावा, म्हणाले…

imran khan

दुबई : केवळ भारत-पाकिस्तानच नाही तर जगभरातील क्रिकेट चाहते 24 ऑक्टोबर 2021 या तारखेची आतुरतेने वाट पाहत होते आणि आता ती तारीख आली आहे. ICC T20 विश्वचषक 2021 मध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. 2019 च्या विश्वचषकानंतर दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत. आजपर्यंत एकाही विश्वचषकात पाकिस्तानला भारताला हरवता आलेले नाही. मात्र यावेळी तसे होणार नाही, असा विश्वास पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी कर्णधार इम्रान खान यांनी व्यक्त केला आहे. इम्रान खान या महान सामन्यापूर्वी म्हणाले की, यावेळी पाकिस्तान भारताला नक्कीच पराभूत करेल.

पाकिस्तानी पंतप्रधान जिओ टीव्हीवर म्हणाले, ‘या संघात भारताला हरवण्याची प्रतिभा आहे. हा सामना पाकिस्तान नक्कीच जिंकेल. 50 षटकांच्या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सात सामने खेळले गेले आहेत आणि सर्व सामने भारताने जिंकले आहेत, टी-20 विश्वचषकाबद्दल बोलायचे तर, दोन्ही संघांमध्ये एकूण पाच सामने झाले आहेत, त्यापैकी एक सामना हे बॉल-आउट द्वारे ठरवले गेले होते, पण भारताने ते जिंकले देखील होते. 2007 च्या T20 विश्वचषकात या दोन संघांमध्ये विजेतेपदाचा सामना झाला होता आणि तेव्हाही भारताने बाजी मारली होती.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनेही भारताविरुद्धच्या सामन्याआधी सांगितले की, जे झाले ते बोलून काही उपयोग नाही आणि संघाचे संपूर्ण लक्ष या सामन्यावर असेल. बाबर आझम म्हणाला की, भारताविरुद्ध विजयाची नोंद केल्यानंतर संघ पुनरागमन करेल, असा पूर्ण विश्वास आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आज संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे.

महत्वाच्या बातम्या