fbpx

पुलवामा हल्ल्याला पंतप्रधान आणि राष्ट्रपती जबाबदार, अझम खान यांनी तोडले आक्कलेचे तारे

टीम महाराष्ट्र देशा : पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर सबंध देशात दहशतवाद्यांची निंदा केली जात आहे. तर देशभरात संतापाची लाट उसळली असून समाजिक स्तरातून बदल्याची मागणी होत आहे. देशावर दु:खाची झालर असताना समाजवादी पक्षाच्या आझम खान यांनी परिस्थितीच गांभीर्य न ठेवता बेताल वक्तव्य केलं आहे. अझम खान यांनी या हल्ल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद जबाबदार असल्याचे वक्तव्य केले आहे. ते रामपूरमध्ये माध्यमांशी बोलत असताना त्यांनी आपल्या आक्कलेचे तारे तोडले आहेत.

अझम खान म्हणाले की, अशी एखादी घटना होणारच होती कारण नरेंद्र मोदी स्वतःच्या राजकीय कामांसाठी देशातील तपास यंत्रणा, गुप्तचर यंत्रणांचा वापर करत आहेत. मोदींनी तपास यंत्रणांना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे जावई राबर्ट वाड्रा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या मागे लावले आहे. परिणामी पुलवामासारखा हल्ला होणारच होता. त्यामुळे या घटनेला मोदीच जबाबदार आहेत.असे मतलबी वक्तव्य आझम खान यांनी केले.

अशा या बेताल वक्तव्यामुळे समाजिक स्तरातून आझम खान यांच्यावर टिका होत आहे. आज देशासाठी शहीद झालेल्या या ४२ वीरजवानांवर आपल्या गावी अंत्यसंस्कार केले जात आहेत. यावेळी सारा देश शोकाकुल असून या वीर पुत्रांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभा आहे. पण आझम खान सारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना देशापेक्षा राजकारण मोठे वाटत आहे.