‘पंतप्रधान आणि गृहमंत्री बंगालला खोटी स्वप्न दाखविण्यात व्यस्त आहेत’

'पंतप्रधान आणि गृहमंत्री

कोलकाता : देशात सध्या पाच राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू ,केरळ आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरी यांचा समावेश आहे. या निवडणुकीत बंगाल ची निवडणूक प्रतिष्ठेची लढत बनली आहे. येथे मोदी विरूद्ध ममता असाच प्रचार निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासून सुरू आहे.

दरम्यान देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली असून करोनाबाधितांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. यावरून देखील केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये आरोग्य व्यवस्थे विषयक सुविधांवरुन वाद सुरू असल्याने विरोधी पक्षाकडून केंद्रावर टीका होत आहे. यामध्ये आता तृणमूल काँग्रेसने थेट गुजरातमधील परिस्थितीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

तृणमूल काँग्रेसने गुजरातमधील एका सरकारी करोना रुग्णालयातील परिस्थिती दाखवणारा व्हिडीओ शेअर केलाय.’या धक्कादायक व्हिडीओमध्ये रुग्णांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे, गुजरात मधील भावनगरयेथील सरकारी रुग्णालयामध्ये रुग्ण जमीनीवर पडून असल्याचा व्हिडीओ समोर आलाय. हे असं घडतय कारण पंतप्रधान आणि गृहमंत्री बंगालमध्ये खोटी आश्वासनं देण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे जर हे सोनार गुजरात (सुवर्ण काळ असणारं विकसित गुजरात) असेल तर आम्हाला माफ करा आम्हाला सोनार बंगला नकोय,’ असा टोला तृणमूलने ट्विटरवरुन लागवला आहे. अशी टीका तृणमूल काँग्रेस कडून करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :