पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ही देशातील सर्वोच्च पदे मला मान्य नाहीत – आंबेडकर

prakash aambedkar

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ही देशातील सर्वोच्च पदे आहेत, हे मला मान्य नाही,जनता हीच देशातील सर्वोच्च ताकद आहे. आमच्याकडे ती ताकद आहे आणि आम्ही पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना त्यासमोर झुकायला भाग पाडू,असे विधान भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले. संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी सोमवारी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनाला सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच आंबेडकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीसाठी बोलावले होते. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या आंदोलनाला तुर्तास स्थगिती देत फडणवीस सरकारला भिडेंना अटक करण्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला.

भिडेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींना फूस आहे की भिडे मोदींना फूस लावतायत हे पाहावं लागेल. संभाजी भिडे आरोपी नंबर एक आहेत एकबोटे आरोपी नंबर दोन आहेत. आरोपी 2 वर कारवाई होते तर आरोपी एकवर का नाही ?, असा प्रश्नही आंबेडकरांनी उपस्थित केला आहे.Loading…
Loading...