आ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास युवतींचा प्रचंड प्रतिसाद

सोलापूर ( प्रतिनिधी) – आ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली श्री छत्रपती रंगभवन येथे आयोजित प्रियदर्शिनी मेळाव्यास युवतींचा प्रचंड प्रतिसाद लाभला. प्रियदर्शनी मेळाव्याचे उद्घाटन प्रियदर्शनीच्या राष्ट्रीय समन्वयक आ. अदिती सिंंग यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करुन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्षा – चारुलता टोकस, प्रियदर्शनीच्या प्रदेश समन्वयक – रुपाली कापसे, सौ. उमा काडादी उपस्थित होते.

श्रीमती इंदिरा गांधी यांची प्रेरणा घेऊन प्रियदर्शनीच्या माध्यमातून राष्ट्रीय महिला काँग्रेसने युवतींसाठी प्रियदर्शिनी ही नवीन संकल्पना आमलात आणली असून याव्दारे भारतातील युवतींना प्रियदर्शिनीच्या माध्यमातून युवतींसाठी सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे मा. आ. आदिती सिंह यांनी यावेळी प्रतिपादन केले.

या कार्यक्रमामध्ये सावित्रीच्या लेकी हा संदेश, महिलांची सद्यस्थिती दर्शविणारी आणि त्यातून स्त्री समानता आणि स्त्री स्वातंत्र्यावर भाष्य करणारे फॅशन शो, युवतींद्वारे झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देणारे पथनाटय तसेच डोळ्यांनी दिव्यांग असलेल्या कु. अवनी राठी हिने आपला जीवन परिचय सर्वांसोबत व्यक्त केला.

या कार्यक्रमास जयश्री बोरकर (भंडारा), जयश्री भुईबर (अकोला), डॉ. हसिना शहा (अमरावती, ग्रामीण), रईसा गवंडे (अमरावती, शहर), शिल्पा जावडे (नागपूर, शहर ग्रामीण), सिध्देश्वरी मेघा (वर्धा), डॉ. मीनल चिडगूपकर, डॉ. अग्रजा चिटणीस-वरेरकर, प्रो. ममता बोल्ली, प्रिती राठी, अवनी राठी, किशोरी राठी, प्रियांका डोंगरे (जिल्हा समन्वयक), श्रध्दा हुल्लेनवरु (शहर समन्वयक), मंजुषा वल्लाकट्टी, ऐश्वर्या हिबारे, स्मिता शाहपूरकर व आदी युवती व महिला बहुसंख्येने उपस्थित होते.