धनंजय मुंडे यांच्या ताब्यातील परळी पंचायत समितीच्या कामाचा राज्यपालांकडून गौरव

blank

टीम महाराष्ट्र देशा : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल परळी पंचायत समितीचा राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे. सध्या परळी पंचायत समितीचा कारभार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यासाठी परळी पंचायत समितीने धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या योजनेअंतर्गत परळी तालुक्यातील प्रभाग ब मधील सिरसाळा येथील 72 लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी पंडित दीनदयाळ योजनेअंतर्गत जागा खरेदी करून देऊन घरे बांधून देण्यात आली आहेत.

परळी मतदारसंघाचे आमदार तथा माजी विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा पुरस्कार परळीच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याचे म्हणत पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सर्व सदस्य, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. दरम्यान, मागील वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील परळी नगरपालिकेच्या स्वच्छता विभागास राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता त्यानंतर आता पंचायत समितीला राज्यपालांच्या हस्ते गौरवण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या :