सर्वसामान्यांचा खिशाला कात्री, पाव आणि ब्रेडच्या किंमती वाढल्या

टीम महाराष्ट्र देशा : ब्रेड तयार करणाऱ्या कंपन्यांनी ब्रेडच्या किंमतीत तीन ते चार रुपयांची वाढ केली आहे.  ब्रिटानिया, मॉडर्न, विब्स या कंपन्यांनी ही दरवाढ केली आहे. ४०० ग्रॅम (लहान वडी) ब्रेडची किंमत २२ वरून २५ रुपये, तर ८०० ग्रॅमच्या पुड्याची किंमत ४४ वरून ४८ रुपये झाली आहे. येत्या काही दिवसांत स्थानिक बेकरीमालकही ब्रेडच्या किंमती वाढवतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

नेमक्या का वाढल्या किमती ?

मैद्याच्या वाढलेल्या किंमती आणि राज्य सरकारनं केलेली प्लास्टिक बंदी यामुळे ब्रेडच्या किंमती वाढवण्यात आल्याचं सांगण्यात येतं आहे. मैद्याच्या पीठाच्या ५० किलोच्या पिशवीची किंमत ११५० रुपयांवरून १३०० रुपये झाली आहे. हा वाढत्या खर्चाचा भार सहन करणं कठीण झालं आहे.

मनसेचे नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक