Karnataka Election; निवडणूक संपताच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दरवाढ

टीम महाराष्ट्र देशा- कर्नाटक विधानसभा निवडणुका संपताच गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. कर्नाटक निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. आज सकाळपासूनच नवे वाढीव दर लागू झाले आहेत. मुंबईतील आजचा पेट्रोलचा प्रतिलीटर दर 82.94 रुपये, तर डिझेलचा दर प्रतिलीटर 70.88 रुपये एवढा आहे.

पेट्रोलचे नवे दर :

मुंबई – 82.94 रुपये

दिल्ली – 75.10 रुपये

कोलकाता – 77.79 रुपये

चेन्नई – 77.93 रुपये

डिझेलचे नवे दर :

मुंबई – 70.88 रुपये

दिल्ली – 66.57 रुपये

कोलकात – 69.11 रुपये

चेन्नई – 70.25 रुपये